नंदुरबार पोटनिवडणूकीत जिल्हा परिषदेच्या 11 गट आणि पंचायत समितीच्या 14 गणांसाठी 77 उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत आहे. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे. पोटनिवडणुकीत राजकीय नेत्यांच्या कुटुंबातूनच सर्वाधिक उमेदवार असल्याने घटक पक्षांच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढात मानली जात आहे. जिल्हा परिषदेच्या 18 गटांसाठी 35 उमेदवार तर पंचायत समितीच्या 14 गणांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील कोराई गणात निवडणूक बिनविरोध झाल्याने विजय निश्चित झालाय. जिल्ह्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आमनेसामने आहेत. माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्येने कोळदे गटातून राजकारणात पदार्पण केलंय, तर आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या बहिण खापर गटातून भाजपचे उमेदवार नागेश पाडवी यांच्याविरुद्ध जोरदार टक्कर दिली आहे. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी यांनी पुन्हा कोपरली गटातून निवडणूक लढवली आहे त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
#nandurbar #nandurbarnewsupdates #zpelections #zpelectionsupdates #elections